बाल हक्क संहितेचा इतिहास :-
पहिल्या महायुद्धानंतर जगातील अनेक
राष्ट्रांची वाताहत झाली. अनेक मुलं अनाथ झाली. १९२० साली लीग ऑफ नेशन नावाची एक
आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन झाली. राष्ट्र स्तरावर समझोता घडवून आणणे आणि जगात
पुन्हा असे महायुद्ध होऊ नये या दृष्टीने उपाय योजने हा या संस्थेचा उद्देश होता.
या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर १९२४ साली इंग्लंटाइन
जेब या ब्रिटीश स्त्री ने बालकांच्या हक्काचे एक पाच कलमी पत्रक मांडले आणि ते
मंजूर झाले. त्यानंतर ३५ वर्षांनी १९५९ साली चार्टर ऑफ चिल्ड्रेन्स राईटस् म्हणजेच
मुलांच्या हक्काची सनद संयुक्त राष्ट्र परिषदेपुढे मंडळी गेली.आणि तीही मंजूर
झाली. या सनदेवर सह्या करणाऱ्या निरनिराळ्या
राष्ट्रांच्या प्रतिनिधिमध्ये भारताचा प्रतिनिधीही होता.
त्यानंतर २० नोव्हेंबर १९८९ रोजी
भरलेल्या सर्व साधारण सभेपुढे संयुक्त राष्ट्र परिषदेने बाल हक्काची विस्तृत
संहिता मांडली. जमलेल्या अनेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी मिळून ती मंजूर केली.
भारताने ही संहिता ११ डिसेंबर १९९२ साली सही करून मान्य केली.
थोडक्यात मूळ बाल हक्क संहितेचे
दोन भाग आहेत.
बालकांचे मुलभूत हक्क
या हक्काचा लाभ सर्व बालकांना
मिळावा म्हणून प्रत्येक राष्ट्राने / सरकारने करावयाची कृती.
बाल हक्क संहितेतील मुख्य मुद्दे
:-
या संहितेनुसार :- मूळ ‘बाल’ या
शब्दाची व्याख्या वय वर्षे १८ पर्यंत करण्यात आलेली आहे. वेगवेगळया राज्यात /
देशात वेगवेगळया कायद्यात ‘मुला’ची
व्याख्या काही १२ वर्षे कधी १४ वर्षे तर कधी १६ वर्षे अशी आहे. पण या
संहितेनुसार सर्वत्र वय वर्षे १८ पर्यंत अशी व्याख्या मंजूर झालीय.
काही प्रमुख कलमे यांचे प्रत्यक्ष
वाचन करणे.
कलम क्र. १,२,३, मुलभूत कलमे.
समजा संपूर्ण संहितेचे वाचन करणं
कठीण झाल्यास कमीत कमी खालील कलमे वाचावी आणि चर्चा करावी.
जगण्याचा हक्क कलम क्र. ६,२४
विकासाचा हक्क कलम क्र. २८ (शिक्षण) २९
सहभागाचा हक्क कलम क्र. १२, १३
संरक्षणाचा हक्क कलम क्र. ३२ (बालमजुरी) ३८,४०
अपंग मुलांसाठी विशेष कलम क्र. २३.
कलम ६ – जगण्याचा हक्क : प्रत्येक
मुलाला जगण्याचा मुलभूत हक्क आहे. हे सर्व राष्ट्रांना मान्य आहे.म्हणून सर्व
राष्ट्र मुलं जगतील आणि त्याचा विकास होईल ही काळजी घेईल.
कलम २४- जगण्याचा हक्क : जास्तीत
जास्त निरोगी आयुष्य जगण्याचा आणि आजारीपणात वैद्यकीय मदत मिळण्याचा मुलांचा हक्क
सर्व राष्ट्रांना मान्य आहे.
कलम २८- विकासाचा हक्क : सर्व राष्ट्रांना मान्य आहे कि मुलांना
शिक्षणाचा हक्क आहे. सर्वाना शिक्षणाची समान संधी मिळावी. शाळेमधील शिस्त राखताना
/ राबविताना मुलांचा मन राखला जाईल.
कलम २९- विकासाचा हक्क : मुलांच्या शिक्षणाची दिशा कशी असावी या बद्दल सर्व राष्ट्रांत एक मत आहे. ती
अशी असावी कि ज्यामुळे मुलाची शारीरिक आणि मानसिक शक्ती, त्याचे सुप्त गुण, त्याचे
व्यक्तिमत्व याचा विकास व्हावा.
कलम ३२- संरक्षणाचा हक्क : आर्थिक
शोषणापासून आणि कोणत्याही धोकादायक,
शिक्षणाच्या शारीरिक आणि मानसिक प्रगतीच्या आड येणाऱ्या कामापासून संरक्षण
मिळण्याचा मुलांचा हक्क सर्व राष्ट्रांना मान्य आहे
कलम ३८ - संरक्षणाचा हक्क :
जेंव्हा सशस्त्र लढे होतात तेंव्हा मानवी हक्क आणि माणुसकीची वागणूक या बद्दल जे आंतरराष्ट्रीय
नियम आहेत त्यातील मुलांच्या बाबतीतील नियम सर्व राष्ट्र पाळण्याची हमी घेत आहे.
कलम १२- सहभागाचा हक़्क़ : ज्या
मुलाला आपली स्वताची मते बनविण्याची कुवत
आलेली आहे त्याला त्याच्या हिता संबंधिच्या सर्व गोष्टीबद्दल मत देण्याचा हक्क
आहे.मुलांच्या बुद्धीची कुवत लक्षात घेऊन त्याच्या मताचा विचार केलं जाईल.
कलम १३ - सहभागाचा हक़्क़ : मुलाला
आपले विचार प्रगत करण्याचा हक़्क़ आहे सर्व तऱ्हेची माहिती शोधणे अगर इतराना देणे. बोलण्यातून,
लिखाणातून आणि चित्रातून माहितीची देवाण घेवाण करणे शक्य आहे..
कलम २३- अपंग मुलांसाठी विशेष हक्क
; सर्व राष्ट्रांना मान्य आहे कि शारीरिक
किंवा मानसिक दृष्ट्या अपंग मुलांनाही स्वावलंबी आणि मानाचे आयुष्य जगता यावे आणि
समाजात मिसळता यावे.
No comments:
Post a Comment