काय आहेत मुलांचे अधिकार ?
संयुक्त राष्ट्र परिषदेने २०
नोव्हेंबर रोजी पारित केलेल्या बाल हक्क संहितेनुसार एकूण ५४ अधिकारांना चार
प्रमुख अधिकारांमध्ये विभागले आहे ते आहेत
पुढीलप्रमाणे :-
जगण्याचा
हक्क :- पहिला महत्वाचा हक्क आहे
तो जगण्याचा. गर्भावस्थेत आणि जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला हा मुलभूत हक्क
आहे. जन्म झाल्यानंतर स्वताचे अस्तित्व असण्याचाही मुलांना हक्क आहे म्हणूनच
प्रत्येक मुलाला स्वताचे नाव, पत्ता, आणि राष्ट्रीयत्व आहे. प्रत्येक जन्माची नोंद
व्हायला हवी. यालाच सलग्न म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या सर्वाचा हक़्क़ कुटुंबात
राहण्याचा आई वडिलांसोबत राहण्याचा हक्क स्वछ हवा , स्वच्छ पाणी , वैद्यकीय सुविधा
आपले बालपण सुरक्षित वातावरणात घालवण्याचा हक्क असे सर्व हक्क जगण्याच्या हक्कांशी
संबंधित आहेत. निरनिराळ्या तऱ्हेच्या संकटात आपत्तीत किंवा कठीण परिस्थितीत
सापडलेल्या मुलांचा हा मुलभूत हक्क डावलला जाऊ शकतो. जसे:-
|
संकटे /कठीण परिस्थिती
नैसर्गिक :-
दुष्काळ, महापूर, भूकंप
आर्थिक/सामाजिक :-
गरिबी, मुलगा हवा या अट्टाहासामुळे मुलीचा हक्क नाकारणे
युद्ध :-
दंगे
परिस्थिती :- अनाथ निराधार, बाल वेश्या , रस्त्यावर राहणारी मुलं , काळजी आणि
संरक्षणाची गरज असणारी सर्व मुलं
|
विकासाचा
हक्क :- मुलांचा सर्वागीण विकास
व्हावा या साठी अनेक गोष्टींची आवशक्यता असते जसे:-
- · शारीरिक
- · मानसिक
- · बौद्धिक
- · सामाजिक
या चार उपविभागांमाध्येही
अनेक गोष्टींचा समावेश होतो.आणि हे चारही उपविभाग उत्तम विकासासाठी आवश्यक आहेत.
त्यामध्ये पहिला /दुसरा अशी प्राथमिकता
करता येत नाही प्रत्येक मुलाला प्रत्येक विषयाच्या सर्व संधी मिळावयास हव्यात.
सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थाना आपले कार्यक्रम योजताना या
गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे.
सहभागाचा
हक्क :- अनेकदा लहान मुलांना आपण
नासमज अडाणी समजतो, पण प्रत्येक मुलाला स्वताचे व्यक्तिमत्व असते. स्वताचे विचार
मत असतात आणि ते विचार मांडण्याचा त्यांना
हक्क आहे.त्यासाठी मोठ्या व्यक्तींना स्वता मध्ये बदल करायला हवा , मुलांना काय
समजते? त्यांनी फ़क़्त सांगितलेली आज्ञा पाळावयाची ! आज्ञाधारक मुलगा म्हणजे सर्वात
गुणी मुलगा असे न मानता आपल्या विचारात बदक करायला हवेत. यासाठी मुलांना मंच
उपलब्ध / तयार करून द्यायला हवेत. संधी द्यायला हवी.ही संधी कुटुंबात, शाळेत,
गावात, रोजच्या व्यवहारात मिळायला हवी. मुलांच्या संदर्भात प्रत्येक कार्यक्रमात
मुलांचा सहभाग वाढवता येतो.आणि केवळ उपस्थित राहून सहभाग देणारी मुलं हळू हळू
स्वतः निर्णय घेऊ शकतात. आणि स्वतंत्रपणे
आपलं निर्णय राबविण्यासाठी कार्यक्रमही
घेऊ शकतात. मुलांचा सहभाग वाढविण्यासाठी बाल गट, बालभारती असे कार्यक्रम हाती घेता
येतील. किंवा कार्यरत असलेल्या कार्यक्रमांमध्येही मुलांना चर्चेची, संयोजनाची,
निर्णयाची जबाबदारी देत देत त्यांचा सहभाग वाढविता येतो.
संरक्षणाचा
हक्क :- अनेकदा मुलांचे
वेगवेगळ्या प्रकारे शोषण होण्याची शक्यता असते काही वेळा ती मुलगी आहे म्हणून तर
काही वेळा अपंग आहे, अनाथ आहे, बाल कामगार आहे म्हणून......
|
शोषणाची
कारणे /प्रकार
|
||||
|
शारीरक
|
मानसिक
|
लैंगिक
|
आर्थिक
|
सामाजिक
|
|
मारणे
|
दुर्लक्ष
|
प्रत्यक्ष कृतीद्वरे
|
गरिबी
|
उपेक्षित घटक
|
|
इजा करणे
|
अपमान
|
बोलाण्याद्वारे
|
वेठबिगारी
|
भटके विमुक्त
|
|
उपासमार
|
शिव्या
|
हावभाव
|
बालमजुरी
|
अनुसूचितजाती
|
|
|
|
चित्राद्वारे
|
|
धर्मावरआधारित
|
|
|
|
भीती दाखऊन
|
|
|
अशा विविध प्रकारचे शोषण
थांबावे म्हणून मुलांना संरक्षणाचा हक्क आहे.या सर्व परिस्थितीत मुलांना संरक्षण
मिळाले पाहिजे.
अनेकदा मुलांमध्ये भेदभाव
केलं जातो . हा भेदभाव –
लिंग आधारित मुलगा किंवा मुलगी आहे म्हणून.
अपंगत्वामुळे शारीरिक किंवा मानसिकरित्या अपंग
आहे म्हणून
सामाजिक परिस्थितीमुळे एका विशीष्ट धर्म / जाती /वंशात जन्मला/ली
म्हणून केला जातो.
या सर्व प्रकारच्या
भेदभावापासून मुलांना संरक्षण मिळावयास हवं.